Wednesday, March 2, 2011

'पाटीवरची' रेष' या स्त्री शिक्षणावर आधारित चित्रपटाची घोषणा.

Pathivarchi Resh
'सरोज आनंद चित्र' या बॅनरखाली सुप्रसिद्ध संगीत दिग्दर्शक माँटी शर्मा आणि त्यांचे पिताश्री आनंद शर्मा या द्वयीने 'पाटीवरची रेष' या स्त्री शिक्षणावर आधारित चित्रपटाची घोषणा केली आहे. माँटी शर्मा आणि अभिनेता युग हा चित्रपट दिग्दर्शित करणार आहेत.

'स्त्री शिक्षण फार गरजेचं आहे' या आशयावर चित्रपटाची कथा असून कथा, पटकथा आणि संवाद युग यांचेच आहेत. 

अशिक्षीत असल्याने माणसाचं किती मोठं नुकसान जोऊ शकतं आणि खास करुन मुलीच्या आयुष्यात हे किती धोकादायक आहे याचं वास्तववादी चित्रण आणि एक संदेश यात देण्यात आला आहे. युग यात महत्त्वपूर्ण भूमिकेत असून इतर कलावंतांची निवड होताच या चित्रपटाच चित्रीकरण सुरु होणार आहे.

No comments:

Post a Comment