Saturday, March 5, 2011

महाराष्ट्रात घुमणार 'हर हर महादेव'.

Har Har Mahadev
'श्री संकल्प फिल्म प्रॉडक्शन'च्या बॅनरखाली निर्माते शरद शेलार यांनी 'हर हर महादेव' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. या बॅनरची ही पहिलीच निर्मिती असून दिग्दर्शक सुभाष फडके यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 

'हर हर महादेव' या चित्रपटाची कथा, पटकथा आहे सुभाष फडके यांची आणि संवाद त्यांनी अभिजीत जोशी यांच्या समवेत लिहीले आहे. अभिजीत उदय यांनी या चित्रपटाला साजेस संगीत दिलं आहे. अनुभवी कॅमेरामन विश्वनाथ मठ यांच या चित्रपटाला छायांकन लाभल आहे. संकलक दिलीप कोटलगी, कला दिग्दर्शन देवदास भंडारे यांच आहे. अमर शेलार या चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत.

या चित्रपटात संजय नार्वेकर चार वेगवेगळ्या भुमिकेत असून सोबत अरुण नलावडे, अमिता खोपकर, रेखा कामत, नागेश भोसले, गौरी सुखटणकर, साहिल पिंपळे यांच्या भुमिका आहेत.

No comments:

Post a Comment