Tuesday, March 22, 2011

विविध मागण्यांसाठी सात दिवस एकपडदा चित्रपटगृहे बंद ठेवण्याचा चित्रपटगृह मालकांचा निर्णय.

मल्टिप्लेक्स मुळे एकपडदा चित्रपटगृहांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. करमणूक कर, शो टॅक्स, ऍडव्हर्टाईज टॅक्स आणि पायरसी अशा वेगवेगळ्या गोष्टींचा परिणाम या व्यवसायावर झाला आहे. या सर्व गोष्टी सरकारच्या ल़क्षात आणून देण्यासाठी येत्या शुक्रवारपासून सात दिवस एकपडदा चित्रपटगृहे बंद ठेवण्याचा निर्णय सर्व चित्रपट्गृह चालक आणि मालक यांनी घेतला आहे. 

सिनेमा ओनर्स अँड एक्झिबिटर्स असोसिएशन, सिने सर्किट असोसिएशन आणि मराठवाडा चित्रपट असोसिएशन यांच्यातर्फे हा बंद पाळण्यात येणार असून राज्यभरातील सुमारे साडेसहाशेहून अधिक एकपडदा चित्रपटगृह या बंदमध्ये सामील होणार आहेत.

No comments:

Post a Comment