Thursday, July 15, 2010
संगीत नाटक अकादमीचे युवा पुरस्कार जाहीर.
Saturday, June 12, 2010
'अर्जुन' चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात.
'विनर्स एन्टरटेन्मेंट' प्रस्तुत, शशिकांत खामकर निर्मित आणि शैलेश शंकर काळे दिग्दर्शित 'अर्जुन' या मराठी चित्रीकरण सुरु आहे. प्रतिकूल परिस्थितीतून यशाचे शिखर गाठणार्या एका धडपडया व जिद्दी तरुणाची कथा व व्यथा 'अर्जुन' या चित्रपटातून आपल्या समोर येणार आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन श्री. शैलेश शंकर काळे यांनी केले आहे तर चित्रपटाची कथा- पटकथा व संवादाची बाजू श्री सुमित बोनकर व श्री. राहुल यशोद यांनी सांभाळली आहे. कथानकाला साजेशी या चित्रपटाची गीते व संगीत सचिन मालप यांनी गीत व संगीताची जबाबदारी पेलली आहे.
चित्रपटाचे दिग्दर्शन श्री. शैलेश शंकर काळे यांनी केले आहे तर चित्रपटाची कथा- पटकथा व संवादाची बाजू श्री सुमित बोनकर व श्री. राहुल यशोद यांनी सांभाळली आहे. कथानकाला साजेशी या चित्रपटाची गीते व संगीत सचिन मालप यांनी गीत व संगीताची जबाबदारी पेलली आहे.
एकता कपूरची मराठी मालिका 'माझिया प्रियाला प्रित कळेना' झी मराठी'वर.
ही एक प्रेम कथा आहे. एका एन.आर.आय मुलीची आणि एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलाची. या मालिकेच्या माध्यमातून मृणाल दुसनिस आणि अभिजीत खांडकेकर हे दोन नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीस येत असून स्नेहा कुलकर्णी, प्रसाद जावडे हे 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या रिएलिटी शो मधले स्पर्धक व अनुभवी संजय मोने, सुहिता थत्ते, सुमुखी पेंडसे, अमिता खोपकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
'राजा शिवछत्रपती' चित्रपटाच्या माध्यमातून हिंदी आणि इंग्रजीतून बनवण्यासाठी नितीन देसाई सज्ज.
सध्या देसाई आपल्या प्रसिद्ध मालिका 'राजा शिवछत्रपतीच्या' डीव्हीडी प्रदर्शनाच्या कामात व्यस्त असून ते आणखी एक भव्य ऐतिहासिक मालिका 'श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी' 'ई टिव्ही मराठी'वर १४ जून २०१० पासून घेऊन येत आहेत.
चित्रपटावर प्रत्यक्षात काम करण्यापूर्वी संभाजी महाराजांच्या जीवनपट उलगणार्या मालिकेची निर्मिती करणार आहेत. ज्यात डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असून चित्रपटातली राजा शिवछत्रपतींची भूमिका सुद्धा तेच साकारताना दिसणार आहे.
चित्रपटाला जिवंतपणा यावा यासाठी नितीन देसाई यांनी काही महत्त्वाचे प्रसंग महाराष्ट्रातल्या प्रत्यक्ष किल्ल्यांवर चित्रीकरण करण्याचे ठरवले आहे त्यासाठी त्यांनी परवानगीसाठी अर्जसुद्धा केले आहेत. भव्य दिव्य देखाव्यांप्रमाणेच चित्रपटाचे बजेट सुद्धा भव्यच असणार यात शंका नाही.
'मी सिंधुताई सपकाळ' चित्रपटाच्या चित्रीकरणास लवकरच सुरुवात
'मी सिंधुताई सपकाळ' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा हिंदीतील अभिनेता-दिग्दर्शक अनंत नारायण महादेवन यांनी उचलली आहे. बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात नुकताच या चित्रपटाचा फर्स्ट लूक, छायाचित्र आणि माहितीपत्रकाच्या माध्यमातून प्रदर्शित करण्यात आला. तेजस्विनी पंडीत या चित्रपटात सिंधुताई सपकाळ यांची व्यक्तीरेखा साकारणार आहे.
Friday, June 11, 2010
महिलांकडून महिलांसाठी 'संहिता'ची निर्मिती.
नीता देवकर, अमृता राव आणि माधुरी आशिरगडे या तीन निर्मात्या एकत्र येऊन 'सुर्यतेज प्रॉडक्शन' या बॅनरखाली 'संहिता' या चित्रपटाची निर्मिती करित आहेत. सुमित्रा भावे या चित्रपटाचे दिग्दर्शन करित असून स्त्रीची विविध रुपे, तिच्या आयुष्यातील सुख-दु:ख, भावभावना मांडणारी कथा-पटकथा व संवादही त्यांचेच आहेत. सुनंदा कळुसकर आणि वंदना वाकनीस या कार्यकारी निर्मात्या आहेत. कला दिग्दर्शन, संगीत, संकलन, वितरण, प्रसिद्धी आदी जबाबदार्या महिलाच सांभाळणार असून पुरुष फक्त कलाकार म्हणून असतील.
Tuesday, March 9, 2010
उषा किरण यांना श्रद्धांजली
दहा वर्षांपूर्वी त्या आपल्याला सोडून गेल्या हे आजही खरे वाटत नाही. उषा किरण ह्यांनी विविध चित्रपटांतून साकार केलेल्या भूमिका आजही आपल्या डोळ्यांसमोर ताज्या आहेत. खरोखरच त्या मराठी, गुजराथी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेल्या अभिनेत्री होत्या असेच म्हणावे लागेल. त्यांच्या चार दशकाच्या करीअर मध्ये त्यांनी जवळजवळ ३०० चित्रपटात अभिनय केला. त्यापैकी 'कन्यादान मधील आभिनायासाठी त्यांना महाराष्ट्र सरकारचा 'सर्वोत्कृष्ट आभिनेत्रीच्या' पुरस्काराने गौरविण्यात आले. उषा किरण ह्यांचे अजून गौरविण्यात आलेले अभिनय म्हणजे त्यांनी साकारलेल्या 'शेजारची बायको' आणि 'गरिबाघरची लेक' या चित्रपटांतील भूमिका. मराठीबरोबरच हिंदी चित्रपटातून सुद्धा त्यांनी चांगलाच नावलौकिक मिळवला. त्या वेळच्या दिग्गज कलाकारांसोबत त्या प्रमुख भूमिकेत चमकल्या. नंतर बरीच वर्ष त्या सहकलाकार म्हणून अभिनय करत राहिल्या. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त मराठीमुव्हीवर्ल्डतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली.
Subscribe to:
Posts (Atom)