Saturday, June 12, 2010

एकता कपूरची मराठी मालिका 'माझिया प्रियाला प्रित कळेना' झी मराठी'वर.

माझिया प्रियाला प्रित कळेना
हिंदी सिरिअल्स मध्ये मराठी कुटुंबांच दर्शन घडवल्यानंतर एकता कपूर आता एक प्रेमकथा घेऊन येत आहेत ती सुद्धा मराठीत, मराठी चॅनेलवर. हो 'माझ्या प्रियाला प्रित कळेना' ही बालाजी टेलिफिल्म्सची नवी मालिका १४ जूनपासून 'झी मराठी'वर रात्री ८ वा प्रदर्शित होत आहे.

ही एक प्रेम कथा आहे. एका एन.आर.आय मुलीची आणि एका मध्यमवर्गीय कुटुंबातल्या मुलाची. या मालिकेच्या माध्यमातून मृणाल दुसनिस आणि अभिजीत खांडकेकर हे दोन नवे चेहरे प्रेक्षकांच्या भेटीस येत असून स्नेहा कुलकर्णी, प्रसाद जावडे हे 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या रिएलिटी शो मधले स्पर्धक व अनुभवी संजय मोने, सुहिता थत्ते, सुमुखी पेंडसे, अमिता खोपकर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

No comments:

Post a Comment