सध्या देसाई आपल्या प्रसिद्ध मालिका 'राजा शिवछत्रपतीच्या' डीव्हीडी प्रदर्शनाच्या कामात व्यस्त असून ते आणखी एक भव्य ऐतिहासिक मालिका 'श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानी' 'ई टिव्ही मराठी'वर १४ जून २०१० पासून घेऊन येत आहेत.
चित्रपटावर प्रत्यक्षात काम करण्यापूर्वी संभाजी महाराजांच्या जीवनपट उलगणार्या मालिकेची निर्मिती करणार आहेत. ज्यात डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असून चित्रपटातली राजा शिवछत्रपतींची भूमिका सुद्धा तेच साकारताना दिसणार आहे.
चित्रपटाला जिवंतपणा यावा यासाठी नितीन देसाई यांनी काही महत्त्वाचे प्रसंग महाराष्ट्रातल्या प्रत्यक्ष किल्ल्यांवर चित्रीकरण करण्याचे ठरवले आहे त्यासाठी त्यांनी परवानगीसाठी अर्जसुद्धा केले आहेत. भव्य दिव्य देखाव्यांप्रमाणेच चित्रपटाचे बजेट सुद्धा भव्यच असणार यात शंका नाही.
No comments:
Post a Comment