Thursday, July 15, 2010

संगीत नाटक अकादमीचे युवा पुरस्कार जाहीर.

शहनाईनवाझ उस्ताद बिस्मिल्ला खाँ यांच्या स्मरणार्थ संगीत नाटक अकादमीने सन २००६ पासून युवा पुरस्कारांना सुरुवात केली. कला क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील हा महत्त्वाचा पुरस्कार मानला जातो. सन २००९ च्या पुरस्कारांसाठीची घोषणा नुकतीच झाली असून,  त्यात मुक्ता बर्वे हिला अभिनयासाठी आणि रेश्मा-मुसळे-परितेकर हिला लोकनृत्यासाठी तर जुही बब्बरला वेषभूषेसाठी या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येणार आहे. महाराष्ट्रातून कलावंत निवडीच्या प्रक्रियेसाठी रोहिणी हट्टंगडी आणि प्रकाश खांडगे हे परीक्षक होते.

No comments:

Post a Comment