'साई शंकर फिल्मस' या निर्मिती संस्थेचा 'तीन बायका फजिती ऐका' हा आगामी विनोदी चित्रपट.येत्या २३ मार्चला प्रेक्षकांच्या भेटीस येतोय. 'दुभंग ' या प्रेमपटानंतर त्यांचा येऊ घातलेला हा दुसरा मराठी चित्रपट आहे. शंकर रामेश्वर मिटकरी निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन राजू पार्सेकर यांनी केले आहे.
श्री तीरुपती बालाजीवर मराठीत पहिल्यांदाच चित्रपट निर्मीती केली जात आहे. लाखो भावीकांचे श्रद्धास्थान असलेल्या बालाजीवर चित्रपट तयार होत असून मराठीतील आणि हिंदीतील दिग्गज कलाकार या सिनेमात काम करणार आहेत. तर बालाजी मंदिराच्या भव्य दिव्य सेटचे काम देखील सुरु झाले असून हा चित्रपट मराठी चित्रपट सृष्टीच्या इतिहासातील बीग बजेट सिनेमा ठरेल, याचे शिवधनुष्य उचलय पुण्याच्या जितेंद्र वाईकर यांनी. श्री तीरुपती बालाजी म्हणजे भारतातील अनेक भविकांचे श्रद्धास्थान. महाराष्ट्रातही घराघरात श्री. बालाजीची मनोभावे पूजा केली जाते. असे जरी असले तरी अनेक भाविकांना बालाजीची कथा देखिल पूर्णपणे माहित नाही. बलाजींची कथा ही नुसतीच श्रवणीय आणि रंजक नाही तर त्यामुळे अनेक संकटांचे मोचन करण्याचे देखील क्षमता आहे. त्या मुळेच श्री बलाजींची कथा महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला माहित व्हावी हीच इच्छा मनी बाळगून श्री तीरुपती बालाजी यांच्यावर चित्रपट बनविण्याची प्रबळ इच्छा श्री जितेंद्र वाईकर यांच्या मनात जागृत झाली . ''श्री तीरुपती बालाजी महिमा '' या चित्रपटाची पटकथा श्री जितेंद्र वाईकर यांनी लिहीली आहे. त्याच प्रमाणे दिग्दर्शन आणि निर्मितीची बाजूही त्यांनीच उचलली आहे. या चित्रपटाचे संवाद व संहितेचे लेखन नाट्य अभिनेते व लेखक श्रीकृष्ण देशमुख यांनी केले आहे. त्याच प्रमाणे या चित्रपटाला अनेक हिंदी व मराठीतील कलाकारांची दर्जेदार स्टारकास्टही लाभली आहेत. अनेक उत्तम दर्जाचे तंत्रज्ञ देखील या चित्रपटासाठी काम करणार आहेत. त्यामुळेच श्री बालाजींच्या अनेक भक्तांसाठी हा चित्रपट म्हणजे एक पर्वणीच असणार आहे.
No comments:
Post a Comment