'मदर्स डे एक दिवस आईचा' या चित्रपटाची कथा जन्मदाती आई आणि वाढवणारी आई ह्यांच्या वात्सल्यावर आधारित आहे. हिंदी आणि तामिळ चित्रपटांच्या दिग्दर्शनाचा अनुभव असलेले दिग्दर्शक राजू सुब्रमण्यम हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. गीतकार आरती सामंत देसाई ह्यांनी लिहिलेल्या गीतांना अनुभवी संगीतकार अरविंद हळदीपूरकर ह्यांनी संगीत दिले आहे.
या चित्रपटाची कथा दिग्दर्शक राजू सुब्रमण्यम ह्यांची असून संवाद आनंद म्हस्वेकर ह्यांचे आहेत. साऊथमधील बर्याच चित्रपटांचा अनुभव असलेले कॅमेरामन मंजुनाथ यांनी छायांकनाची जबाबदारी स्विकारली आहे.
या चित्रपटात अरुण नलावडे, यतीन कार्येकर, इला भाटे, भाग्यश्री राणे, मयुरेश पवार ह्या कलाकारांसोबत अनलेश देसाई आणि अवंतिका सॅलियन ही नवी जोडी पदार्पण करत आहे.
No comments:
Post a Comment