डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणदिनाच्या निमित्ताने,तीन डिसेंबरला "रमाबाई भीमराव आंबेडकर' हा चित्रपट मराठवाड्यासह मुंबईत प्रदर्शित झाला आहे. मराठीतील या चित्रपटाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाल्यामुळे,निर्माते व दिग्दर्शक प्रकाश जाधव यांनी या चित्रपटाचे हिंदीतील डबिंग पूर्ण केले आहे.
"रमाबाई भीमराव आंबेडकर' याच नावाने हा चित्रपट इतर राज्यांत प्रदर्शित केला जाणार आहे. रमाबाई बाबासाहेबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या. त्यांचे जीवन खूप खडतर आणि कष्टप्रद होते. आतापर्यंत बाबासाहेबांवर बरेच हिंदी-मराठी चित्रपट आले; परंतु रमाईंचे कार्य जनतेसमोर यावे या उद्देशाने निर्मात्याने हा चित्रपट बनविला आहे. आता तो जगभरात जावा म्हणजे रमाईंचे कार्य सगळ्यांना समजावे, याकरिता हिंदी भाषेत हा चित्रपट बनविला जात आहे.
मराठी भाषेतील हा चित्रपट आतापर्यंत वर्षा गायकवाड, प्रवीण दरेकर, रामदास आठवले अशा काही राजकीय मंडळींनी पाहिलेला आहे आणि त्यांनी त्याचे भरपूर कौतुक केले आहे. प्रवीणदरेकर यांनी एक लाख रुपयांचा धनादेश या चित्रपटाला मदत म्हणून दिला आहे. विश्वनाथ तायडे यांनी दीड लाख रुपयांची मदत केली; तसेच वर्षा गायकवाड आणि रामदास आठवले यांनी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.
No comments:
Post a Comment