सुहास जोशी, विक्रम गोखले, महेश मांजरेकर आणि सिद्धार्थ जाधव हे येत्या काही दिवसात मराठी नाट्य रसिकांच्या चर्चेचा विषय असणार आहेत. कारण सुहास जोशी आणि विक्रम गोखले रंगमंचावर जवळपास ३० वर्षांनी एकत्र दिसणार आहेत. महेश मांजरेकरसुद्धा 'मी शारुक मांजरसुंभेकर' या नाटकाद्वारे लेखक आणि दिग्दर्शक या नवीन भूमिकेत आपल्या भेटीला येणार आहे. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २९ डिसेंबरला होणार आहे. या नाटकात सागर कारंडे, रुपाली भोसले आणि किशोर रावराणे यांच्या सोबत सिद्धार्थ जाधव प्रमुख भूमिकेत आहे.
'कथा (द स्टोरी)', ज्यामुळे सुहास जोशी आणि विक्रम गोखले एकत्र दिसणार आहेत, पती पत्नीचे नाजूक नाते खेळकर पद्धतीने आपल्यासमोर आणणार आहेत. या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग २६ डिसेंबरला होणार आहे. डबल रोल मुळे होणारी फुल टु धमाल कॉमेडी 'चेहराफेरी' नाटकातून १८ डिसेंबरपासून पहायला मिळणार आहे. भूषण कडू या मध्ये दुहेरी भूमिका साकारत आहे. त्यासोबत रसिका वेंगुर्लेकर, पूजा चव्हाण आणि दिप्ती मोरे यांच्याही यात भूमिका आहेत.
नवरा बायकोच्या वयातील अंतर, वेगवेगळा स्वभाव यामुळे होणारी भांडणं आणि उत्तर यांच विनोदी शैलीने कथन करणारं नाटक म्हणजेच 'नवा गडी.. नवं राज्य'.... उमेश कामत, प्रिया बापट, हेमंत ढोमे, उर्जा देशपांडे ही तरुण टीम हे नाटक सादर करणार आहे. प्रसिद्ध नाटककार विजय तेंडुलकर यांच 'घाशीराम कोतवाल' हे नाटक जवळपास ६ वर्षांच्या गॅपने पुन्हा रंगमंचावर येण्यास सज्ज झाले आहे. याचा पहिला प्रयोग १९ डिसेंबरला बालगंधर्व रंगमंदिरात झाला. तसेच 'गुंतता हृदय हे' हे गाजलेले नाटक सुद्धा नव्या टिमसह सज्ज आहे.

No comments:
Post a Comment