या कार्यक्रमाचे सूत्र संचालन मराठी चित्रपटसृष्टीतील नामवंत कलाकार प्रसाद ओक हे करत आहेत. हया कार्यक्रमामध्ये आपली आई मुलाला किती ओळखते किवा बायको आपल्या पतीला किती समजते, हे पाहायलामिळेल. दोघींची एक दुस्यांशी तीन भागात लढाई होणार आहे. दर्शनो मीटर, शपत राउंड आणि किचन राउंड हया तीन भागात विभागणीझाल्याने हया कार्यक्रमालावेगळाच रंग चढेल.
स्टार प्रवाहाच्या प्रोग्रामिंग प्रमुख श्रावणी देवधर सांगतात की हा कार्यक्रम बघताना तुम्ही तुमच्या घरातील भांडण विसरून हया कार्यक्रमामधीलभांडण बघत बसाल. कारण हया भांडणामध्ये एक प्रेम आहे, आपलेपणा आहे. हे प्रेम तुम्ही कोणत्याही मापामध्ये मापु शकत नाही. हे पाहताना तुम्ही खूप आनंदी व्हाल. हा कर्यक्रम ६ डिसेंबर पासून सोमवार ते शनिवार संध्याकाळी ६.३० वाजता स्टार प्रवाहवर पहाता येइल.
No comments:
Post a Comment