मराठी चित्रपट आणि टेलिव्हिजनच्या सध्याच्या आघाडीच्या नायिका या पर्वाच्या स्पर्धक आहेत. त्यामध्ये नेहा पेंडसे, गिरीजा ओक, मृण्मयी देशपांडे, उर्मिला कानेटकर, नेहा जोशी, स्मिता तांबे, आरती सोलंकी आणि सोनाली खरे. ही टक्कर थोडी आणखी रंगतदार व्हावी म्हणून लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांचा सुद्धा यात सहभाग आहे.
या स्पर्धकांना त्यांच उत्तमोत्तम सादरीकरण करण्यासाठी मयुर वैद्य, फुलवा खामकर आणि दिपाली विचारे या सध्याच्या नावाजलेल्या नृत्यदिग्दर्शकांच मार्गदर्शन मिळणार आहे. आणि या सगळ्यांच परीक्षण अर्थातच महागुरु सचिन पिळगावकर करत आहेत. पुष्कर क्षोत्री या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करत आहे.
'एका पेक्षा एक - अप्सरा आली' २९ डिसेंबर पासून बुधवार आणि गुरुवार रात्री ९.३० वा 'झी मराठी' वर प्रसारित होणार आहे.
No comments:
Post a Comment