तिचा 'नवरा अवली बायको लवली' हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. तसेच तिचे अजून ५ चित्रपटप्रदर्शनाच्या मार्गावर आहेत. तिने एम कॉम पर्यंत शिक्षण घेतले असून कॉलेज मध्ये असताना तिने अनेक नाटकामधून, कॉलेज फेस्टिवल्स मधून कामं केली आहेत.
'वारस' ही आई मुलाच्या हळुवार नात्याची अतिशय संवेदनशील कथा आहे. येत्या ६ डिसेंबर पासून ही मालिका सोमवार ते शनिवार सायंकाळी ६.३० वाजता झी मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येईल. 'वारस' ही 'श्री सिद्धिविनायक चित्र'ची निर्मिती असून खलील हेरेकर हे या मालिकेचे दिग्दर्शक आहेत. नरेश बोर्डे या मालिकेचे निर्माते आहेत. वारस मध्ये सियाबरोबर आदित्य वैद्य, उदय टिकेकर, मुग्धा गोडबोले, विलास उजवणे, श्रीकांत देसाई असे अनेक नावाजलेले कलाकार आहेत.
No comments:
Post a Comment