अनलेशचा हा पहिलाच सिनेमा असला तरी त्याने आपल्या सहजसुंदर अभिनयाने यातील भूमिका साकारली आहे. या चित्रपटात यतीन कार्येकर, अरुण नलावडे, इला भाटे, प्रसाद पंडित, रवी पटवर्धन, संजीवनी जाधव, भाग्यश्री राणे, विवेक पांडकर, यशवंत चोपडे, मयुर पवार या अनुभवी कलाकारांसोबत तितक्याच तोडीचा अभिनय साकारण्याचे आव्हान त्याने खुबीने पेलले आहे.
आजच्या तरुणाईचे प्रतिनिधीत्व करणारी राहुलची भूमिका अनलेशने साकारली असून त्याच्या आई वडिलांशी असणार्या नातेसंबंधावर 'साद' हा चित्रपट भाष्य करतो. चित्रपटाच्या काही महत्त्वाच्या प्रसंगांचे चित्रीकरण मलेशियात करण्यात आले आहे. हा चित्रपट ५ ऑक्टोबरला राज्यभरात सर्वत्र प्रदर्शित होतोय.
No comments:
Post a Comment