१९७८ साली हे नाटक 'माऊली प्रॉडक्शन्स' मुंबई या संस्थेने सादर प्रथम सादर केलं होत. विजयाबाईंनी दिग्दर्शित केलेल्या आणि त्यांनी स्वतः 'हमिदाबाई' ची भूमिका साकारलेल्या या नाटकात अशोक सराफ, नाना पाटेकर, भारती आचरेकर, प्रदिप वेलणकर, नीना कुलकर्णी, दिलीप कोल्हटकर, जनार्दन परब या कलाकारांनी आपल्या कसदार अभिनयाने आपापल्या भूमिकेत रंग भरले होते.
'सुबक' निर्मित या नव्या संचात त्यावेळच्या नाटकात 'शब्बो'ची भूमिका साकारणार्या नीना कुलकर्णी आता 'हमिदाबाई' साकारत आहेत. त्यांच्यासह संजय नार्वेकर, जितेंद्र जोशी, स्मिता तांबे, मनवा नाईक, मंगेश सातपुते, विकास पाटील हे कलाकार आव्हानात्मक भूमिकांमध्ये दिसणार आहेत. अनुभवी दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी या नाटकाचे दिग्दर्शन करीत आहेत.
No comments:
Post a Comment