संदीप मनोहर नवरे यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून कथा लेखन सुद्धा त्यांचेच आहे. पटकथा आणि संवादलेखनहेमंत एदलाबादकर यांचे आहे. हा चित्रपट ११ फेब्रुवारीला संपुर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. प्रविण दवणे यांनी लिहीलेल्या गीतांना संदीप- सचिन- शैलेश यांनी या चित्रपटासाठी संगीत दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात एकूण ५ गाणी आहेत ज्यांना सुरेश वाडकर, वैशाली सामंत, आनंद शिंदे, कुणाल गांजावाला, साधना सरगम, शान आणि बेला सुलाखे अशा गायकांचा आवाज आहे.
अशोक सराफ, प्रसाद ओक, तेजस्विनी पंडीत, सई रानडे, विजय चव्हाण, रविंद्र बेर्डे, किशोरी अंबिये, आशालता वाबगावकर, विकास समुद्रे यांच्या या चित्रपटात भूमिका आहेत.
No comments:
Post a Comment