गेली बारा वर्षे सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यात अग्रेसर असलेल्या संस्कृती कलादर्पणच्या संस्थेच्या वतीने ज्यांचे कार्य आजही नवतरुणांच्या विचारांना परिणाम देते अशा मान्यवर ज्येष्ठ कलाकारांना यंदा गौरविण्यात आले. या वर्षी ज्येष्ठ रंगकर्मीच्या कार्याची जाणीव व कलेची जोपासना ह्या दोन मुख्य उद्देशाने 'ज्येष्ठ रंगकर्मी सन्मान सोहळा' या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. संस्कृती कलादर्पण तर्फे यंदापासून ज्येष्ठरंगकर्मीना स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.
या पुरस्कारांचे यंदाचे १० मानकरी म्हणून भालचंद्र पेंढारकर, सुहास भालेकर, रोहिणी हट्टंगडी, आशालता, नयनतारा, अशोक पत्की, ए राधास्वामी, सुर्यकांत लवंदे, बाबा पार्सेकर, मोहन लोके, तसेच विशेष मदत म्हणून अनिल तावडे या ज्येष्ठरंगकर्मींना स्मृतीचिन्ह व रोख रक्कम देऊन संस्कृती कलादर्पणतर्फे २४ डिसेंबरला सन्मानित करण्यात आले. अनेक कलकारांच्या नृत्य आणि अभिनयाच्या सादरीकरण लाभलेल्या या सोहळ्याचे दिग्दर्शन महेश टिळेकर यांनी केले होते तर गिरीजा ओक व उमेश कामत यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डू. निलेश साबळे यांनी घेतलेल्या मुलाखतींमुळे कार्यक्रमाला वेगळी रंगत आली.
No comments:
Post a Comment