ना.धों. महानोर यांच दिर्घकाव्य अजिंठा एक प्रेम कहाणी रंगमंचावर.
१७५ वर्षाची मेजर रॉबर्ट गिल आणि पारु यांची सत्यप्रेम कहाणी अजिंठा एक प्रेम कहाणी च्या रुपाने रंगमंचावर नाटयरुपाने आली आहे. पद्मश्री ना. धों. महानोर यांच अजिंठा या दिर्घकाव्यावर आधारीत ही अमरप्रेम कहाणी रंगमंचावर प्रायोगिक धर्तीवर सादर केली जात आहे. एस. कुमार इंटरनॅशनल निर्मित व सृजण मुंबई प्रस्तुत हा नाट्यनुभव दिग्दर्शक मिलींद इनामदार यांनी दिग्दर्शित केला आहे.. ब्रिटीश मेजर पण मुळात चित्रकार असलेला रॉबर्ट गिलची हिंदुस्थानात बदली होते. अजिंठा वरील चित्र काढीत असताना पारुची भेट होते. मग सुरु होते एक अमर प्रेम कहाणी, ही प्रेम कहाणी ना.धो. महानोर यांनी आपल्या दिर्घकाव्यात काव्य रुपाने मांडली होती.'अजिंठा एक प्रेम कहाणी'ला संगीत दिले आहे संगीतकार संजय गीते यांनी तर संगीत संयोजन अरविंद हसबनीस यांच आहे. गायिका अमृता नातु व संजय गीते यांनी आवाज दिला आहे. नृत्ये अनिल सुतार, प्रकाश योजना आदित्य देशपांडे, वेषभूषा संध्या साळवे, रंगभूषा कृष्णा बोरकर व नेपथ्य अंकुश कांबळी यांच आहे.अजिंठा एक प्रेम कहाणी मध्ये रॉबर्ट गिल आणि पारुच्या महत्त्वाच्या भुमिकेत अक्षर कोठारी व पल्लवी वाघ असून प्रसाद ठोसर, प्रदीप सरवदे, नयनाराणी सोनवणे, वैष्णवी नाईक, दिपाली बडेकर, हर्षिता ब्राम्हणकर, अभिजीत भगत, निरंजन जाधव, मुकुंद ब्राम्हणे, अतुल गोवंडी, जयेश मोरे, योगेश मार्कंडे, राकेश पाटील, आशिष शिर्के यांच्याही भूमिका आहेत.
No comments:
Post a Comment