'वन रुम किचन' ही एक साधी सरळ चाळीतील मध्यमवर्गीय कुटुंबाची कहाणी असून ज्येष्ठ अभिनेत्री हेलन यांनी या चित्रपटात कॅथलिक आईची भूमिका साकारली आहे. तसेच चित्रपटात प्रमुख भूमिकेत भरत जाधव, भार्गवी चिरमुले, राजेश शृंगारपुरे, किशोरी गोडबोले असून सोबत विजू खोटे, आशालता, विजय चव्हाण, किशोरी अंबिये, विजय चव्हाण, संजय मोहिते, स्मिता शेवाळे, राकेश बेदी, किशोर प्रधान, लिलाधर कांबळी, संदीप पाठक यांच्या भूमिका आहेत.
तसेच अश्वमेघ प्रॉडक्शन्स निर्मित विजू माने दिग्दर्शित 'शर्यत' हा चित्रपट. या चित्रपटाची कथा आणि पटकथा हेमंत एदलाबादकर आणि विजू माने यांचे असून हेमंत एदलाबादकर आणि विजू माने यांच्या सोबत नंदकिशोर चौघुले यांनी संवादलेखन केले आहे. विजू माने आणि अशोक बागवे यांनी लिहीलेल्या गीतांना चिनार महेश यांच संगीत आहे.
सचिन पिळगावकर एका वेगळ्या लुकमध्ये दिसणार असून त्यांच्या सोबतच संतोष जुवेकर आणि विद्याधर जोशी सुद्धा 'शर्यत' मध्ये आहेत.
No comments:
Post a Comment