या चित्रपटाचे क्रिएटिव्ह प्रोड्युसर म्हणून उमेश कुलकर्णी काम पाहणार असून कथा, पटकथा आणि संवदलेखन गिरीश कुलकर्णी यांचे आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते एच. एम. रामचंद्र या चित्रपटाचे छ्यांकन करणार असून संकलन अभिजीत देशपांडे करणार आहेत. चित्रपटाची गीते सुनील सुकथनकर यांनी लिहीली असून आनंद मोडक यांनी संगीत दिले आहे.
या चित्रपटात गिरीश कुलकर्णी मध्यवर्ती भूमिकेत असून अमृता सुभाष, दिलीप प्रभावळकर, डॉ. मोहन आगाशे, हृषिकेश जोशी, श्रीकांत यादव, प्रवीण तरडे, शशांक शेंडे हे कलाकार आहेत.
No comments:
Post a Comment