Friday, July 8, 2011

'धुंद क्षण' - बेला शेंडेचा नवा अल्बम लवकरच.

सुप्रसिद्ध पार्श्वगायिका बेला शेंडे यांचा 'धुंद क्षण' हा नवा अल्बम लवकरच येत आहे. हरिभाऊ विश्वनाथ कंपनी प्रस्तुत या अल्बमचे मार्केटिंग युनिव्हर्सल म्युझिक इंडीया लि. ही कंपनी करत आहे.

या नविन अल्बममध्ये 'रंगी तुझ्या अशी रंगले', 'झिम्माड सर निघाली', 'राधा दिवाणी रे हे गीत', 'खुलते मी अशी आठवता कुणी', 'मी एकटीच असते', 'अल्लड या लाटांनी', 'ओल्या ओल्या या देहावर', ' देही श्रावण सरतो गं' अशी इंडियन, वेस्टर्न, गजल अशा वेगवेगळ्या मुडची ८ गाणी असून सुरेश भट, मिलिंद जोशी, चंद्रशेखर सानेकर, श्रीरंग गोडबोले, आश्विनी शेंडे यांनी लिहीलेल्या गीतांना ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांच्यासह मिथिलेश पाटणकर, नीलेश मोहरीर आणि अविनाश- विश्वजीत अशा उत्कृष्ट संगीतकारांनी संगीत दिले आहे.

No comments:

Post a Comment