प्रभाकर निकळंकर यांनी हिंदीतील 'पाकिजा', 'कुवारा बाप', 'हिर रांझा', 'बॉम्बे टू गोवा' आणि मराठीतील 'अपराध', 'अश्या रंगल्या' रात्री या गाजलेल्या चित्रपटांचे छायाचित्रण केले. प्रभाकर निकळंकर हे एक उत्तम चित्रकार सुद्धा होते. त्याने मराठीतील सवाई हवालदार, महानदीच्या तीरावर या चित्रपटांसाठी दिग्दर्शक, निर्माता आणि छायाचित्रकार अशी तिहेरी भूमिका पार पडली होती.
प्रभाकर निकळंकर यांना त्यांच्या कामासाठी अनेक पुरस्काराने गौरविण्यात आलेय. जीवन गौरव पुरस्कार, चित्रकर्मी पुरस्कार या बरोबरच दादासाहेब फाळके अकादमीच्या वतीने छायाचित्रणाच्या विशेष पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. 'चंदनाची उटी' या मराठी चित्रपटाच्या निर्मितीसाठी ते सध्या कार्यरत होते .
No comments:
Post a Comment