Tuesday, July 12, 2011

'उदय' चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण.

गोव्याची पार्श्वभूमी असलेल्या आणि अस्सल कोकणी माणसाच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणार्‍या 'कलाक्षेत्र बॅनर'ची निर्मिती असलेल्या 'उदय' या मराठी चित्रपटाचे चित्रीकरण नुकतेच गोव्यात पूर्ण झाले.

निर्माते प्रविणकुमार पासी यांची ही पहिलीच मराठी निर्मिती आहे. कथा-पटकथा आणि दिग्दर्शन जितेंद्र शिकेरकर यांचे असून संवाद युवराज पाटील यांचे आहेत. या चित्रपटाद्वारे राम यशवर्धन हा नवोदित चेहरा मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. राम यशवर्धनसह या चित्रपटात अविनाश नारकर, संपदा जोगळेकर- कुलकर्णी, तेजश्री प्रधान, शरद पोंक्षे, किशोर नांदलस्कर, आनंदा कारेकर, अरुण कदम, अनिरुद्ध हरीप, संजय मोहिते यांच्या प्रमुख भूमिका असून  विनय आपटे पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

No comments:

Post a Comment