Tuesday, July 26, 2011

'एकाच या जन्मी जणू' १ ऑगस्टपासून.

कडवा स्वाभिमान, जबरदस्त मनोधैर्य, बुलंद, आत्मविश्वास आणि दुर्दम्य आशावादाची ही कथा 'एकाच या जन्मी जणू' झी मराठीवर १ ऑगस्टपासून दर सोमवार ते शनिवार रात्री आठ वाजता दाखल होतेय.

ही कथा आहे अंजलीची. दिसायला अत्यंत सुंदर, तितकीच हुशार, मनमिळाऊ, सर्वांवर प्रेम करणारी आणि कुणाच्याही मदतीला कधीही धावून जाणारी. देवानं तिला सगळं काही दिलयं.. पण या सगळ्याबरोबरच आणखीही एक गोष्ट ईश्वरानं तिच्या पदरी टाकलीय, ती महणजे अपंगत्व.

'टेल अ टेल मिडीया'ची निर्मिती असलेल्या या मालिकेचे निर्माते आहेत, महेश तागडे आणि जितेंद्र गुप्ता. तर या मालिकेचे दिग्दर्शन केलेय मंगेश कंठाळे यांनी. आश्विनी शेंडे हिने  लिहिलेल्या शिर्षक गीताला निलेश मोहरीर यांच संगीत असून ते वैशाली सामंत हिने गायले आहे. तेजस्विनीपंडित अंजलीच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत असून मानसी साळवी, मानसी कुलकर्णी, पियुष रानडे, मेगह्ना वैद्य, उदय सबनीस. सुलभा देशपांडे, जयंत घाटे, हेमांगी राव, सुप्रिया पाठारे, वर्षा दांदळे यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.

No comments:

Post a Comment