लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोयं 'संसाराची माया'.
'२१ न्यु सेंचुरे फिल्म्स' अंतर्गत पूनम झांवर यांनी 'संसाराची माया' या चित्रपटाची निर्मिती केली आहे. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये लोकप्रिय असलेल्या पूनम झांवर यांची ही पहिलीच मराठी निर्मिती असून दिपक कदम यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. 'एका लग्नाची गोष्ट', 'अशी ही फसवा फसवी' आणि 'भंडारा प्रेमाचा' या चित्रपटांच्या यशानंतर दिग्दर्शक दिपक कदम यांनी 'संसाराची माया' या चित्रपटाद्वारे आणखीन एक वेगळा विषय हाताळला आहे. या चित्रपटामध्ये योगेश महाजन, मैथिली जावकर, उमेश ठाकूर, महेश कोळी, दीपज्योती नाईक, स्नेहल विलणकर, अक्षिता, स्वप्नील राजशेखर, संजय कसबेकर, कोमल आपके, अभिजीत कुलकर्णी आणि नैना कर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत.
No comments:
Post a Comment