Thursday, September 2, 2010

छायाचित्रकार देबू देवधर यांचे निधन

मराठी आणि हिंदी चित्रपटातून आपल्या कॅमेर्‍याची कमाल दाखवणार्‍या छायाचित्रकार शंकर देवधर म्हणजेच देबू देवधर यांचे बुधवारी संध्याकाळी फुफ्फुसाच्या कर्करोगाने ओशिवारा येथे निधन झाले. ते गेल्या सहा महिन्यांपासून आजारी होते व त्यांच्यावर नानावटी रुग्णालयात उपचार चालू होते. ते ६२ वर्षांचे होते. 'फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिटयूट ऑफ इंडिया' मधून छायाचित्रणाची पदवी घेतली. 

रमाकांत कवठेकर यांच्या 'नागीन' चित्रपटापासून त्यांनी कॅमेरामन म्हणून सुरुवात केली. त्यांनी राज दत्त, अमोल पालेकर, अझिझ मिर्झा, नाना पाटेकर, भिमसेन अशा दिग्दर्शांसोबत काम केलं होत. महाराष्ट्र राज्य पुरस्कार, झी गौरव पुरस्कार, गोवा राज्य पुरस्कार अशा पुरस्कारांचे ते मानकरी होते. 

अलिकडे त्यांनी 'मर्मबंध' या मराठी चित्रपटासाठी काम केले होते. तसेच आगामी 'लाडी गोडी' आणि 'तमाशा' या चित्रपटासाठी सुद्धा त्यांनी छायाचित्रण केले आहे. त्यांनी यापूर्वी सावली (२००७), मातीमाय(२००६), क्षण (२००६), लाल सलाम (२००२), पेहचान (२००५), स्टंप्ड (२००३), ध्यासपर्व( २००१), कैरी(२०००), लेकरु (२०००), सिलसिलाहै प्यार का(१९९९), बनगरवाडी (१९९६), प्रहार (१९९१), लपंडाव (१९९३), शेजारी शेजारी, गाव तसं चांगल, तिन्हीसांजा अशा बर्‍याचशा चित्रपटांचे छायाचित्रण केले होते.

No comments:

Post a Comment