Saturday, May 7, 2011

दादासाहेब फाळके यांचे छायाचित्र प्रत्येक सिनेमागृहात लागलेच पाहीजे - महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना.

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांचे छायाचित्र प्रत्येक सिनेमागृहात लागलेच पाहीजे व त्यांच्या योगदानाची माहिती देणारा लघुपट दाखवलाच पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने केली आहे. यासंबंधीचे लेखी पत्र सर्व सिनेमागृहांच्या व्यवस्थापकांना मनसेने पाठवले आहे. 

दादासाहेब फाळके यांनी भारतीय सिनेसृष्टीला दिलेल्या योगदानाची कल्पना आजच्या तरूण पिढीला नाही. त्यांची १४१ वी जयंती नुकतीच ३० एप्रिल रोजी होती, याचाही दुर्दैवाने सिनेसृष्टीला विसर पडलेला आहे, अशी खंत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी व्यक्त केली. म्हणूनच प्रत्येक सिनेमागृहाच्या दर्शनी भागावर फाळके यांचे छायाचित्र लावावे व त्यांच्या कार्याची माहिती देणारा लघुपट दाखवला जावा असं आवाहन अध्यक्ष अमेय खोपकर व सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी एका पत्राद्वारे केलं आहे. या दोन्ही गोष्टींची सात दिवसांच्या आत अंमलबजावणी न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने त्यांची अंमलबजावणी करेल, अशा शब्दांत मनसेने सिनेमागृहांच्या व्यवस्थापकांना दम भरला आहे.

No comments:

Post a Comment