'या गोल गोल डब्यातला' या चित्रपटात अशोक सराफ, स्मिता तळवळकर, संतोष जुवेकर, स्मिता शेवाळे, विजय चव्हाण, माधव अभ्यंकर, आकांक्षा ठाकूर, पपन पाटील आदी कलाकार आहेत. कथा,पटकथा आणि दिग्दर्शन असित रेडीज यांचे असून संगीत सतीश चंद्र यांचे आहे. सिनेमॅटोग्राफी समीर आठल्ये यांची असून नृत्य दिग्दर्शन दिपाली विचारे यांचे तर वेशभूषा पौर्णिमा ओक यांची आहे. निहिरा जोशी, मुग्धा वैशंपायन आणि क्षितिजा तारे यांचा स्वर असणार आहे.
ज्येष्ठ नागरिकांना अभिमानाने आणि ताठ मानेने जगता यावे हा विचार यातून अधोरेखित करण्यात आला आहे. आई- वडिलांवर मुलांनीही प्रेम केले असते तर असे चित्र दिसणार नाही. हा विषय फक्त मराठीपुरताच मर्यादित नसून हा आता राष्ट्रीय नव्हे तर जागतिक प्रश्न बनला आहे. म्हणून या विषयाचे आणि 'या गोल गोल डब्यातला' या चित्रपटाचे महत्व अधिक आहे.
No comments:
Post a Comment