Monday, May 30, 2011

'आभास हा. . . ' ३० मे पासून 'झी मराठीवर.

Apurva Nemalekar
एक नवी, ताजी, टवटवीत प्रेमकथा 'झी मराठीवर दाखल होत आहे. 'आभास हा' ही मालिका ३० मे पासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता रसिकांसमोर येतेय.

'आभास हा' मालिका विद्याधर पाठारे यांच्या आयरिस प्रॉडक्शनची निर्मिती असून आर्याच्या मध्यवर्ती भूमिकेत असणारी अपूर्वा नेमळेकर या मालिकेद्वारे पदार्पण करीत आहे. तिच्याबरोबर चैतन्य चंद्रात्रे, लोकेश गुप्ते, गौरी सुखटणकर, अर्चना पाटकर आणि स्मिता तांबे या मालिकेत मुख्य भूमिकेत आहेत. तसेच महत्त्वाच्या भूमिकेत सुचित्रा बांदेकर, मिलिंद फाटक, अजिंक्य जोशी, चैत्राली गुप्ते, विकास पाटील, संकर्षण कर्‍हाडे, अक्षय वाघमारे, मयूर खांडगे, राम कोल्हटकर, नीला गोखले आदी प्रमुख कलाकार काम करत आहेत. तर या मालिकेचे दिग्दर्शन विनोद लवेकर यांचे आहे.

Saturday, May 28, 2011

"बोले तो मालामाल!!!".

'मी मराठी' वाहिनीवर दि. ०१ जूनपासून, दर बुधवार - गुरुवार, रात्री ९.०० वाजता, एक आगळावेगळा कार्यक्रम सुरु होणार आहे. कार्यक्रमाचे नाव आहे, "बोले तो मालामाल!!!".

समाजकारणाची कौटुंबिक पार्श्वभूमी असलेल्या स्मृती शिंदे आपल्या 'सोबो फिल्म्स' या संस्थेतर्फे या कार्यक्रमाची निर्मिती करत आहेत. त्यामुळे या कार्यक्रमालाही मनोरंजनाबरोबरच सामाजिक जाणिवेचे एक भान आहे.

सोबो फिल्म्सच्या स्मृती शिंदे, श्री. विकास गुलाटी, श्री इम्तियाज पंजवानी हे या कार्यक्रमाचे निर्माते असून, श्री अजित भुरे क्रिएटिव्ह प्रोड्युसर आहेत. हिंदी मालिका विश्वातील अग्रगण्य नाव मानले जाणारे श्री. संदीप सिकंद हे या कार्यक्रमाचे क्रिएटिव्ह हेड आहेत. तसेच, प्रसिद्ध दिग्दर्शक श्री. गिरीश मोहिते हा कार्यक्रम दिग्दर्शित करत असून श्री. सुबोध खानोलकर लेखनाची बाजू सांभाळत आहेत. भरत जाधव, निर्मिती सावंत, सिद्धार्थ जाधव, शिल्पा शिरोडकर, अतुल परचुरे, स्वप्निल बांदोडकर, सुकन्या कुलकर्णी- मोने, गणेश यादव यांसारखे अनेक बडे कलावंत आपली सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी एक दिवस सामान्य माणसांत मिसळून त्याच्या व्यवसायाची अदलाबदली करणार आहेत.

Wednesday, May 18, 2011

'या गोल गोल डब्यातला' चित्रपटाचा मुहूर्त संपन्न.

रिद्धी एन्टरटेन्मेंटची पहिलीच निर्मिती असलेला आणि असित रेडीज लिखित दिग्दर्शित 'या गोल गोल डब्यातला' नावाचा चित्रपट आता लवकरच तयार होतोय. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त  कुमार व्हिला येथे एचआयडीएलचे अशोक कुमार गुप्त यांच्या हस्ते करण्यात आला. या प्रसंगी गीता, निर्माते मितेश देसाई - निस्सार खान, अभिनेते अशोक सराफ, नाटककार, संवादलेखक प्रवीण शांताराम आदी उपस्थित होते. या मुहूर्ताच्या सोहळ्यानंतर  स्मिता तळवळकर, माधव अभ्यंकर आणि स्मिता शेवाळे बाल कलाकार पपन पाटील आकांक्षा यांचे काही महत्वाचे घरातले सीन चित्रित करण्यात आले. येत्या १५ जून पर्यंत ' या गोल डब्यातला ' चे संपूर्ण चित्रीकरण पूर्ण होणार आहे.

'या गोल गोल डब्यातला' या चित्रपटात अशोक सराफ, स्मिता तळवळकर, संतोष जुवेकर, स्मिता शेवाळे, विजय चव्हाण, माधव अभ्यंकर, आकांक्षा ठाकूर, पपन पाटील आदी कलाकार आहेत. कथा,पटकथा आणि दिग्दर्शन असित रेडीज यांचे असून संगीत सतीश चंद्र यांचे आहे. सिनेमॅटोग्राफी समीर आठल्ये यांची असून नृत्य दिग्दर्शन दिपाली विचारे यांचे तर वेशभूषा पौर्णिमा ओक यांची आहे. निहिरा जोशी, मुग्धा वैशंपायन आणि क्षितिजा तारे यांचा स्वर असणार आहे.  

ज्येष्ठ  नागरिकांना अभिमानाने आणि ताठ मानेने जगता यावे हा विचार यातून अधोरेखित करण्यात आला आहे. आई- वडिलांवर मुलांनीही प्रेम केले असते तर असे चित्र दिसणार नाही. हा विषय फक्त मराठीपुरताच मर्यादित नसून हा आता राष्ट्रीय नव्हे तर जागतिक प्रश्न बनला आहे. म्हणून या विषयाचे आणि 'या गोल गोल डब्यातला' या चित्रपटाचे महत्व अधिक आहे.

Friday, May 13, 2011

'अविरत फिल्म्स' या संस्थेने बनविलेल्या लघुपटांचे सादरीकरण

पुण्यातील 'अविरत फिल्म्स' या हौशी तरुणांच्या संस्थेने बनविलेल्या चार लघुपटांचे सादरीकरण शनिवार दि. १४ मे रोजी सायंकाळी ७.३० वाजता व रविवार दि. १५  मे रोजी सकाळी ११ वाजता सुदर्शन रंगमंच, पुणे येथे होणार आहे .  यामध्ये वेगवेगळ्या विषयांवरील शोर्ट फिल्म्स दाखविल्या जाणार आहेत . Ice Short Film Festival , पुलोत्सव , Iconoclast, Gujrat International Film Festival,  अश्या विविध महोत्सवात त्यामधील फिल्म्स यापूर्वी सदर झालेल्या आहेत.

एका भिकारल्या अचानक एके दिवशी धनप्राप्ती होते आणि त्याचे एका दिवसाचे आयुष्य बदलून जात, याचा उत्तर चित्रण 'Smile' या लघुपटात आहे . सतीश आळेकारांच्या ''दार कुणी उघडत नाही' या एकांकिकेवर आधारित लघुपटात नातेसंबंध आणि त्या मागची विकृती यावर प्रकाश टाकला आहे.  कायदा जिथे अपुरा पडतो तिथे 'लगाम' कुणालातरी हाती घ्यावळ लागतो . ह्यावर आधारित 'लगाम' हा लघुपट आहे.  या  लघुपटांमध्ये व्यावसायिक तसेच हौशी कलाकारही आहेत . 

Saturday, May 7, 2011

दादासाहेब फाळके यांचे छायाचित्र प्रत्येक सिनेमागृहात लागलेच पाहीजे - महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना.

भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असलेल्या दादासाहेब फाळके यांचे छायाचित्र प्रत्येक सिनेमागृहात लागलेच पाहीजे व त्यांच्या योगदानाची माहिती देणारा लघुपट दाखवलाच पाहिजे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेने केली आहे. यासंबंधीचे लेखी पत्र सर्व सिनेमागृहांच्या व्यवस्थापकांना मनसेने पाठवले आहे. 

दादासाहेब फाळके यांनी भारतीय सिनेसृष्टीला दिलेल्या योगदानाची कल्पना आजच्या तरूण पिढीला नाही. त्यांची १४१ वी जयंती नुकतीच ३० एप्रिल रोजी होती, याचाही दुर्दैवाने सिनेसृष्टीला विसर पडलेला आहे, अशी खंत महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी व्यक्त केली. म्हणूनच प्रत्येक सिनेमागृहाच्या दर्शनी भागावर फाळके यांचे छायाचित्र लावावे व त्यांच्या कार्याची माहिती देणारा लघुपट दाखवला जावा असं आवाहन अध्यक्ष अमेय खोपकर व सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी एका पत्राद्वारे केलं आहे. या दोन्ही गोष्टींची सात दिवसांच्या आत अंमलबजावणी न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना आपल्या पद्धतीने त्यांची अंमलबजावणी करेल, अशा शब्दांत मनसेने सिनेमागृहांच्या व्यवस्थापकांना दम भरला आहे.

Tuesday, May 3, 2011

'अरे बाबा पुरे' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला.

ऐरावत मोशन पिक्चर्स निर्मित 'अरे बाबा पुरे' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. चेतन मालुसरे यांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रणय तेलंग आणि चेतन मालुसरे या दोघांनी केले आहे.

'अरे बाबा पुरे' ची कथा विनीत कटारीया यांची असून पटकथा विनायक शाह, चेतन मालुसरे आणि विनीत कटारिया यांनी लिहिली आहे. संवाद संजय सावंत यांनी लिहीले आहेत. या चित्रपटात ५ गाणी असून ती मंगेश कांगणे यांनी लिहीली असून आनंद मेनन यांनी संगीत दिले आहे. नंदेश उमप, विवेक नाईक, आनंद मेनन, जान्हवी प्रभू यांनी ती गायली आहेत. 

या चित्रपटात संजय नार्वेकर सोबत विजय चव्हाण, रविंद्र बेर्डे, आनंद अभ्यंकर, जयराज नायर, जयवंत वाडकर, अभय हुनसवाडकर, भूषण घाडी, अरुण कदम, पौर्णिमा अहिरे व नवोदित रुचिता जाधव यांच्या भूमिका आहेत.