Tuesday, September 28, 2010
लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतोयं 'संसाराची माया'.
Monday, September 27, 2010
'एक दिवसाची सुहासिनी' चित्रपटाचा मुहूर्त संपन्न......
चित्रपटाची कथा विनोद कांबळी यांची असून चित्रपटात अशोक शिंदे, जयराज नायर, मानसी पाठारे यांच्या प्रमुख भूमिका आहेत. चित्रपटाची विशेष बाब म्हणजे या मराठी चित्रपटातून हिंदी चित्रपटसृष्टीतील एक प्रसिद्ध स्टंट, पर्सनल बॉडी ट्रेनर आणि अभिनेता गेविन पुनरागमन करतोय.
Saturday, September 18, 2010
'मी सिंधूताई सपकाळ' आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात.
या दोन महोत्सवात सादरीकरण झाल्यानंतर हा चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. बिंदीया खानोलकरांची निर्मिती असलेल्या या चित्रपटाला अशोक पत्की यांचे संगीत आहे. या चित्रपटात तेजस्विनी पंडीत, उपेंद्र लिमये आणि नीना कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
Friday, September 17, 2010
एक आगळा वेगळा 'बोकड' चित्रपटसृष्टीत दाखल होणार.
चित्रपटात एकूण २४ गाणी आहेत. चित्रपटाची कथा या गाण्यातून घडून जाते. अशोक बागवे यांनी लिहिलेल्या गीतांना अवधुत गुप्ते यांनी संगीत दिले आहे. स्वतः अवधूत गुप्तेर, स्वप्निल बांदोडकर, स्वानंद किरकिरे, अमृता सुभाष व जान्हवी यांनी या गीतांना आवाज दिला आहे.
'बोकड' मध्ये सयाजी शिंदे, किशोर कदम, विनय आपटे, प्रिया बेर्डे, अमेय वाघ, राहून साळवे, उदय सबनीस, शरद पोंक्षे, मेघा घाडे आणि मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि महाराष्ट्रात ऑडिशन घेऊन या महाराष्ट्रातील विविध २० कॉलेजची मुलंमुली यांच्या यात प्रमुख भूमिका आहेत. लवकर या चित्रपटाच चित्रिकरण वाई व मुंबईत होणार आहे.
Tuesday, September 14, 2010
तृप्ती भोईरचा आगळा वेगळा प्रयत्न - 'अगडबम'.
प्रोस्थेटिक मेकअपचा वापर कमल हसन व अनिल कपूर या कलावंतांनी आत्तापर्यंत केला आहे. या मेकअपसाठी बाहेरच्या देशातून मेकअपमन मागविण्याची पद्धत आहे. पण तृप्तीने आपल्या मराठी मेकअपमनच्या मदतीने हे साध्य करुन दाखविले आहे. संपूर्ण चित्रपटात एका गलेलठ्ठ मुलीची भूमिका ती करत आहे जी लग्नासाठी तयार आहे.
एक धमाल फँटॅसी म्हणून प्रेक्षक ह्या चित्रपटाकडे पाहणार आहेत, मात्र तृप्तीला या चित्रपटाद्वारे एक वेगळाच विक्रम नोंदवायचा आहे. 'मला बर्याच जणांनी हा चित्रपट हिंदीमध्ये करण्यास सांगितले होते, पण माझी इच्छा होती की हा चित्रपट मराठीतच व्हावा. कारण इतरांनीसुद्धा हा मराठी चित्रपट पहावा हीच माझी इच्छा. गरज लागल्यास पुढे हिंदीत डब करु." असे तृप्तीने मराठीमुव्हीवर्ल्डशी बोलताना सांगितले.
Thursday, September 9, 2010
'भाऊचा धक्का' लवकरच महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार.
निवृत्तीनंतर काय, हा सर्वसामान्यांना पडणारा प्रश्न एस. सी. फिल्म इंटरनॅशनल बॅनरखाली निर्माण झालेला 'भाऊचा धक्का' हा चित्रपट सोडवणार आहे. निर्माती सुनिताताई चव्हाण यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विक्की खरात या तरुण दिग्दर्शकाने चित्रपटाचं दिग्दर्शन केले आहे. संदेश चव्हाण या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. कथा सदानंद दळवी यांची असून पटकथा व संवाद राजेश बामगुडे यांचे आहेत.
'भाऊचा धक्का' या चित्रपटात मोहन जोशी, सिद्धार्थ जाधव, सतिश तारे, संजय खापरे, मयुरा पालांडे, गौरी सुखटणकर, वैभव मांगले, कुशल बद्रिके, राजेश गाडे, संजीवनी जाधव, कोमल धांदे, आनंद म्हसवेकर यांच्या प्रमुख भुमिका आहेत. लवकरच हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
'भाऊचा धक्का' या चित्रपटात मोहन जोशी, सिद्धार्थ जाधव, सतिश तारे, संजय खापरे, मयुरा पालांडे, गौरी सुखटणकर, वैभव मांगले, कुशल बद्रिके, राजेश गाडे, संजीवनी जाधव, कोमल धांदे, आनंद म्हसवेकर यांच्या प्रमुख भुमिका आहेत. लवकरच हा चित्रपट महाराष्ट्रात सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
Thursday, September 2, 2010
छायाचित्रकार देबू देवधर यांचे निधन
रमाकांत कवठेकर यांच्या 'नागीन' चित्रपटापासून त्यांनी कॅमेरामन म्हणून सुरुवात केली. त्यांनी राज दत्त, अमोल पालेकर, अझिझ मिर्झा, नाना पाटेकर, भिमसेन अशा दिग्दर्शांसोबत काम केलं होत. महाराष्ट्र राज्य पुरस्कार, झी गौरव पुरस्कार, गोवा राज्य पुरस्कार अशा पुरस्कारांचे ते मानकरी होते.
अलिकडे त्यांनी 'मर्मबंध' या मराठी चित्रपटासाठी काम केले होते. तसेच आगामी 'लाडी गोडी' आणि 'तमाशा' या चित्रपटासाठी सुद्धा त्यांनी छायाचित्रण केले आहे. त्यांनी यापूर्वी सावली (२००७), मातीमाय(२००६), क्षण (२००६), लाल सलाम (२००२), पेहचान (२००५), स्टंप्ड (२००३), ध्यासपर्व( २००१), कैरी(२०००), लेकरु (२०००), सिलसिलाहै प्यार का(१९९९), बनगरवाडी (१९९६), प्रहार (१९९१), लपंडाव (१९९३), शेजारी शेजारी, गाव तसं चांगल, तिन्हीसांजा अशा बर्याचशा चित्रपटांचे छायाचित्रण केले होते.
Subscribe to:
Comments (Atom)