लोकशाहीर विठ्ठल उमप कालवश.
लोकगीते, पोवाडे, भारुडे तसेच ५०० हून अधिक नाटकांच्या जोरावर मराठमोळया रसिकांवर मोहिनी घालणारे लोकशाहीर विठ्ठल उमप यांचे शुक्रवारी २६ नोव्हेंबरला हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते 'लॉर्ड बुद्धा' वाहिनीच्या लोकार्पण सोहळ्यासाठी दीक्षाभूमीवर आले होते. व्यासपीठावर त्यांना भोवळ आल्याने रुग्णालयात हलविण्यात आले; परंतु तो पर्यंत त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांचे 'फु बाई फु' हे आणि 'ए दादा हावर रे' ही कोळीगीते आजही प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहेत. अस्सल गावरान गोडवा असलेला त्यांच्या पहाडी आवाज सर्व मराठी रसिकांच्या कायम लक्षात राहिल. लोककलेसोबतच त्यांनी काही चित्रपटांतूनही काम केले आहे. 'सुंबरान' ह्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटात त्यांनी रवि काळेंच्या वडिलांची भूमिका केली आहे. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनीलोककलेसाठी योगदान दिलं.
No comments:
Post a Comment