संगीतकार अजय-अतुल प्रथमच पुणेकरांच्या भेटीला.
मूळचे पुणेकर असलेले अजय-अतुल हे संगीतकार प्रथमच पुणेकरांसमोर आपली गाजलेली गाणी सादर करणार आहेत. ९ जानेवारी रोजी सायंकाळी साडेसहा वाजता एसएसपीएमएसच्या मैदानावर 'अजय-अतुल लाइव्ह इन कॉन्सर्ट' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून, प्रसिद्ध गायक शंकर महादेवन, कुणाल गांजावाला, स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत, आनंद शिंदे, योगिता गोडबोले आणि अमृता नातू यामध्ये सहभागी होणार आहेत. अजय-अतुल आपल्या ११० वादकांच्या ताफ्यासह पुण्यात प्रथमच संगीत कार्यक्रम सादर करणार आहेत. परांजपे स्किम्सचे शशांक परांजपे आणि आयफेल रिऍल्टर्सचे राहुल नहार हे या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत. पुण्यातच कारकिर्दीला सुरुवात झाल्याने पुणेकरांसाठी कार्यक्रम करण्याची इच्छा या कार्यक्रमातून पूर्ण होत असल्याचे अजय-अतुल यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment