मी मराठी ही वाहिनी नवीन मालिकांचा नजराणा ऐन श्रावणात घेऊन येत आहे. यातली एक मालिका आहे 'खेळ मांडला'. ही मालिका येत्या ३० ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार ७:३० वाजता सुरु होत आहे. स्मिता ठाकरे 'खेळ मांडला'च्या निर्मात्या असून स्वाती ठाणावाला या सहनिर्मात्या आहेत. या मालिकेची कथा शैलेश पोळ यांची असून पटकथा लेखन शैलेश पोळ व अरविंद जगताप यांचे आहे तसेच दिग्दर्शन परेश पाटील करत आहेत.
'खेळ मांडला' या मालिकेमध्ये श्रद्धा रानडे, प्रिया मराठे, निशिगंधा वाड, सुचित्रा बांडेकर, छाया कदम, शिल्पा नवलकर, अक्षया भिंगार्डे अशा एकाहून एक सरस अभिनय करणार्या अभिनेत्रींसोबत सागर तळाशीलकर, मिलिंद शिंदे, राजन ताम्हणे, केतन क्षीरसागर, संदीप पाठक, कश्यप परुळेकर, स्वप्नील राजशेखर असे तयारीचे कलावंतही आहेत. हरिश सावंत हे या मालिकेचे कॅमेरामन आहेत
No comments:
Post a Comment