भगतसिंग, सुखदेव, राजगुरु. . . भारतीय स्वातंत्र्य संग्रामाच्या ज्वालेतील तीन धगधगते निखारे. इतिहासात त्यांच्या प्रखर देशभक्तीच्या शौर्यगाथा सुवर्णाक्षरात लिहिल्या गेल्यात. या तीन रत्नांतील एक तेजस्वी रत्न म्हणजे मराठी मातीतील शिवराम हरी राजगुरु.२४ ऑगस्ट हा राजगुरुंचा जन्मदिवस. 'श्री भवानी चित्र कम्बाईन' या चित्रपटनिर्मिती संस्थेच्या वतीने नुकतीच क्रांतिवीर राजगुरुंची जयंती साजरी करण्यात आली. मुंबईतल्या जॉगर्स पार्क, लोखंडवाला येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या दरम्यान 'श्री भवानी चित्र कम्बाईन'चे श्री. श्रेयस कामले, राजेंद्र कामले, दिपक गांधी, सुप्रिया सावंत, अँड. मोहन पिंपळे, निर्माते-दिग्दर्शक अशोक कामले आणि अनेक मान्यवर उपस्थित होते.
मी मराठी ही वाहिनी नवीन मालिकांचा नजराणा ऐन श्रावणात घेऊन येत आहे. यातली एक मालिका आहे 'खेळ मांडला'. ही मालिका येत्या ३० ऑगस्टपासून सोमवार ते शनिवार ७:३० वाजता सुरु होत आहे. स्मिता ठाकरे 'खेळ मांडला'च्या निर्मात्या असून स्वाती ठाणावाला या सहनिर्मात्या आहेत. या मालिकेची कथा शैलेश पोळ यांची असून पटकथा लेखन शैलेश पोळ व अरविंद जगताप यांचे आहे तसेच दिग्दर्शन परेश पाटील करत आहेत.'खेळ मांडला' या मालिकेमध्ये श्रद्धा रानडे, प्रिया मराठे, निशिगंधा वाड, सुचित्रा बांडेकर, छाया कदम, शिल्पा नवलकर, अक्षया भिंगार्डे अशा एकाहून एक सरस अभिनय करणार्या अभिनेत्रींसोबत सागर तळाशीलकर, मिलिंद शिंदे, राजन ताम्हणे, केतन क्षीरसागर, संदीप पाठक, कश्यप परुळेकर, स्वप्नील राजशेखर असे तयारीचे कलावंतही आहेत. हरिश सावंत हे या मालिकेचे कॅमेरामन आहेत
निर्माते प्राचार्य. शत्रुघ्न बिरकड आणि दिग्दर्शक निलेश जळमकर यांनी संत गाडगेबाबा महाराज यांच्या आयुष्यावर आणि त्यांच्या एकूण कार्यावर आधारीत 'डेबू' हा चित्रपट तयार केला आहे. 'देव तेथेची जाणावा' अशी सुयोग्य पंचलाईन असलेला हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात २० ऑगस्ट २०१० रोजी प्रदर्शित होत आहे. सुप्रसिद्ध अभिनेते मोहन जोशी यांची या चित्रपटात प्रमुख भूमिका असणार आहे. तसेच मधु कांबिकर, अश्विनी एकबोटे आणि रवी पटवर्धन यांच्यासुद्धा या चित्रपटात भूमिका असणार आहेत.
"स्वतंत्र करण्या भारत आपुला, ज्यांनी वेचीला प्राण! विसरु नका हो कधी कदापी त्यांचे हे बलीदान!" हे या अबाल- वृद्धांच्या मनावर देश स्वातंत्र्य करण्यासाठी आपल्या प्राणाची आहुती देऊन, रक्त सांडवून, आपले सारे आयुष्य भारतदेशासाठी अर्पण करणार्या देशभक्तांच्या बलिदानाची महती कथन करणार्या खास गीताची निर्मिती प्रसिद्ध अभिनेते मुकेश खन्ना यांनी ज्येष्ठ बंधू वेद खन्ना यांच्या सोबतीने त्यांच्या रिषी-राज प्रॉडक्शन्स या निर्मिती संस्थेतर्फे 'अर्धा गंगू अर्धा गोंद्या' या मराठी चित्रपटासाठी केली आहे. लोकप्रिय गायक विनोद राठोड यांच्या आवाजातील हे गीत ज्येष्ठ संगीतकार राम लक्ष्मण यांनी ते संगीतबद्ध केले आहे. गीतकार अनंत जाधव यांनी हे गीत लिहिले असून चित्रपटाचा नायक दिपक राजपूत याच्यावर ते चित्रीत करण्यात आले आहे.
'स्वर्गाचा विजा' हा कौटुंबिक, विनोदी चित्रपट निर्माते रमेश धीरज सिंह यांनी धीरज एंटरटेनमेंट्च्या बॅनरखाली निर्माण केला आहे. दिग्दर्शक राकेश बारोट व शैलेंद्रसिंह राजपूत यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे. रुपाली गायकवाड या चित्रपटाची सहनिर्माती आहे. 'स्वर्गाचा विजा' हा अदभूतपुर्व परंतु संवेदनशील मराठी चित्रपट पूर्ण झाला असून लवकरच हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. ह्या चित्रपटात मोहन जोशी, मिलिंद गुणाजी, योगेश महाजन, किशोर नांदलसकर, आनंद अभ्यंकर, डॉ. विलास उजवणे, दिपज्योती नाईक ह्या दिग्गज कलाकारांबरोबरच कोमल ढिल्लो, रुपाली गायकवाड, राकेश बारोट, रमेश डी. सिंह, प्रविण वाडकर, सोनी सिंह, मिली तांबे व निलम ह्यांच्या प्रमुख भूमिका आहेत.