चित्रपटात दिलीप प्रभावळकर, राजन ताम्हाणे, सुहास जोशी, दीपक शिर्के, मिलिंद वाघ, मेधा गोखले, विकास कदम मुख्य भूमिकांत दिसणार आहेत.
Friday, July 30, 2010
मराठीतला पहिला ग्राफिकल चित्रपट 'रामचंद्र पुरुषोत्तम जोशी' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला.
चित्रपटात दिलीप प्रभावळकर, राजन ताम्हाणे, सुहास जोशी, दीपक शिर्के, मिलिंद वाघ, मेधा गोखले, विकास कदम मुख्य भूमिकांत दिसणार आहेत.
Saturday, July 24, 2010
'वृंदावन' मालिकेचे १०० भाग पूर्ण.
वृंदावन या मालिकेची निर्मिती निता देवकर यांनी आपल्या सुर्यतेज प्रॉडक्शन या निर्मिती संस्थेअंतर्गत केली आहे. या मालिकेचे संवाद निता नामजोशी यांनी लिहिले आहेत. मालिकेचे शिर्षक गीत रोहिणी निनावे यांनी लिहीले असून निलेश मोहरीर यांनी संगीत बद्ध केले आहेत. वृंदावन मालिकेची निर्माण व्यवस्था सुनिल भालेराव याची असून कार्यकारी निर्माता मेनानाथ गाडे आहेत.
Friday, July 23, 2010
एल. जी. प्रॉडक्शन्सच्या "एक कटींग चाय- वन बाय टू" चे चित्रीकरण सुरू!
पप्पू लाड सध्या "एक कटींग चाय- वन बाय टू" या आपल्या आगमी चित्रपटाच्या चित्रीकरणात व्यस्त आहेत. ह्या चित्रपटाचा मुहुर्त थोडया वेगळ्या ठिकाणी, वेगळ्या वेळेवर आणि वेगळ्या वातावरणात पार पडला. ह्या चित्रपटाचा मुहुर्ताचा क्लॅप चक्क मुंबईतल्या चर्नीरोड येथील हिंदू जिमखान्यात त्यांच्या मुलाच्या लग्नातच करण्यात आला तेही उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते. मुहुर्तानंतर मरीन लाईन्स तसेच दक्षिण मुंबईमध्ये "एक कटींग चाय- वन बाय टू" चे चित्रीकरण करण्यात आले. चित्रपटाचे पहिले शेड्युल पूर्ण झाले आहे. चित्रपटाची गोष्ट मुंबईत घडणारी असल्यामुळे चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण मुंबईतच होणार असल्याने प्रेक्षकांना संपूर्ण मुंबापुरीचे दर्शन व मुंबईतल्या रात्रीच्या झगमगटाचे सुद्धा दर्शन होणार आहे.
Thursday, July 15, 2010
संगीत नाटक अकादमीचे युवा पुरस्कार जाहीर.
Subscribe to:
Comments (Atom)