प्रख्यात अभिनेते मोहन जोशी प्रमुख भूमिकेत असून त्यांच्यासह वंदना वाकनीस, गौरी सुखटणकर, रुचा हसबनीस, स्वप्नील फडके, आशीष कुलकर्णी, निर्मल कोटणीस, आशा साठे व बालकलाकार वेदांती गायकवाड यांच्या भूमिका आहेत. शरद पोंक्षे लक्षवेधी भूमिकेत आहेत. अश्विनी शेंडे यांनी लिहिलेल्या शिर्षक गीताला अशोक पत्की यांनी संगीत दिले आहे. संकलन नरपत चौधरी व कला दिग्दर्शन समरेष करत आहेत. अमिता खोपकर मालिकेच्या क्रिएटीव्ह हेड असून शाहीद सय्यद कार्यकारी निर्माते आहेत.
'भैरोबा' ही कौटुंबिक, विनोदी मालिका साम मराठी वाहिनीवरील मालिका सर्व स्तरावरील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल असे निर्मात्यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment